पाकच्या क्रिकेटपटूने मंदिरात जाऊन केली मदत...

shahid afridi distributed essential food items to hindu visits temple photo viral
shahid afridi distributed essential food items to hindu visits temple photo viral

इस्लामाबाद : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे गरीब नागरिकांचे हाल होत असून, अनेकजण मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू मदतीसाठी पुढे आला असून, छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानमध्येही कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाई आणि आर्थिक मंदीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे अनेकजण मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही मदत सुरू केली आहे. आफ्रिदीची होप नॉट आउट ही संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून तो गरजूंना मदत करतो. पाकिस्तानमधील एक मंदिरात जाऊन त्याने हिंदू नागरिकांना साहित्य दिले आहे. या अभियानाअंतर्गत आफ्रिदीने पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमधील गरजू व्यक्तींना अन्नदान केले. संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आफ्रिदीने मदत केल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याने म्हटले आहे की, 'आपण सर्वजण एकत्र आहोत, कोरोनाशी दोनहात करू यात. एकता हीच आपली ताकद आहे. लक्ष्मी नारायण मंदिरात आम्ही गरजेच्या सामानाचे वितरण केले.' दरम्यान, आफ्रिदीने केलेल्या मदतीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि युवराज सिंहने त्याचे कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com