शाहरूखची बहिण पाकमधून लढविणार निवडणूक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

इस्लामाबाद: अभिनेता शाहरुख खान याची चुलत बहिण नूरजहाँ ही पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी होणारी सार्वत्रिक निवडणूक लढविणार आहे. खैबर पख्तूनवा विधानसभा मतदारसंघातून अपेक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणाऱ्या नूरजहाँने आपल्याला शाहरुख खानप्रमाणे समर्थन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नूरजहाँ या आपल्या कुटुंबासमवेत कटाल भागात राहत असून, त्या शाहरुख खानला दोनदा भेटल्या आहेत. दोन्ही कुटुंबातील संबंध चांगले आहेत. शाहरुख खानला ज्याप्रमाणे पाठिंबा मिळतो आणि लोक प्रेम करतात, तसेच प्रेम मलाही निवडणूकीत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना नूरजहाँ म्हणाल्या की, "महिला सबलीकरणासाठी मला काम करायचं आहे. माझ्या मतदारसंघात मी या विषयावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मला आशा आहे की, इथले नागरिक माझ्याही पाठीशी राहतील."

नूरजहाँ कोण आहे?
नूरजहाँ ही शाहरुख खानची सख्खी चुलत बहिण आहे. शाहरुख खानचे काका गुलाम मोहम्मद उर्फ गामा यांची ती मुलगी आहे. 1997 मध्ये मुंबईत आली असताना नूरजहाँ आणि शाहरुखची भेट झाली होती. तर शाहरुखने 1978 आणि 1980 या सालात पेशावरमधील वडिलोपार्जित घराला भेट दिल्याचं नूरजहाँ यांनी सांगितलं. शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि खान अब्दुल गफार खान यांचे कट्टर समर्थक होते. फाळणीपूर्वी त्याचं कुटुंब पेशावरमध्ये राहायचं. फाळणीनंतर ते भारतात आले. पंरतु त्याच्या कुटुंबातील काही सदस्य पाकिस्तानमध्ये राहतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shahrukh khans cousin noor jehan to contest elections in pakistan