Shi Yongxin, the controversial abbot of Shaolin Temple : चीनमधील बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र असलेल्या शाओलिन मंदिराचे मठाधीश शी योंगजीन (Shi Yongxin) यांच्यावर भ्रष्टाचार तसेच एका पेक्षा जास्त महिलांशी अनैतिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शाओलिन मंदिराने जारी केलेल्या निवेदनानुसार, शी योंगजीन यांच्याविरुद्ध आपराधिक कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून तपास केला जातो आहे. ‘चाइना डेली’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.