निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा शरीफ यांचा आरोप 

पीटीआय
शनिवार, 28 जुलै 2018

 पाकिस्तानमधील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज केला. या निवडणुकीतील निकाल संशयास्पद असून, त्याचा देशाच्या राजकारणावर वाईट परिणाम होईल, असा इशाराही शरीफ यांनी दिला. 

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज केला. या निवडणुकीतील निकाल संशयास्पद असून, त्याचा देशाच्या राजकारणावर वाईट परिणाम होईल, असा इशाराही शरीफ यांनी दिला. 

रावळपिंडीतील आदिआला तुरुंगात सध्या शिक्षा भोगत असलेल्या शरीफ यांची त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी भेट घेतली. फैसलाबाद, लाहोर आणि रावळपिंडी येथील निवडणुकीचे निकाल संशयास्पद असल्याचा दावा शरीफ यांनी केल्याचे त्यांना भेटलेल्या नेत्यांनी माध्यमांना सांगितले. शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाज पक्षाच्या या भागातील उमेदवारांची स्थिती मजबूत आहे, मात्र त्यांना पराभूत घोषित केले असल्याचा दावाही शरीफ यांनी केला आहे.

2013 मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षाही या वेळी इम्रान खान यांची स्थिती कमकुवत होती. या वेळच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे शरीफ म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharifs allegation has resulted in malfunction in the election