Bangladesh Elections: बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांनी स्पष्ट केले की, अवामी लीगला निवडणुकीपासून दूर ठेवले गेले आहे आणि त्या बेकायदेशीर सरकारखाली परतणार नाहीत. त्या दिल्लीमध्ये निर्वासित जीवन जगत असून, घटनात्मक मूल्यांवर आधारित सत्तेची अपेक्षा व्यक्त केली.
नवी दिल्ली : ‘‘बांगलादेशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमच्या बांगलादेश अवामी लीग पक्षाला निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले आहे, त्यामुळे आमचे लाखो कार्यकर्ते निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहेत.