

Sheikh Hasina
esakal
Sheikh Hasina Death Penalty: बांदलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातल्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्यूनलने (आयसीटी) दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीना यांनी या निर्णयाला एकतर्फी आणि राजकीय प्रेरित निर्णय असल्याचं म्हटलंय. त्या म्हणाल्या, माझं म्हणणं ऐकून घेल्याशिवाय हा निर्णय देण्यात आलेला आहे. जनतेतून निवडून न आलेल्या सरकारच्या न्यायाधिकाराने हा निर्णय दिला आहे.. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे.''