Sheikh Hasina Death Sentence Demand : ''शेख हसीना यांना मृत्युदंड द्या'' ; बांगलदेशच्या 'ICT' मुख्य अभियोक्त्यांची मागणी!

Bangladesh ICT Chief Prosecutor demands death sentence for Sheikh Hasina : तब्बल १४०० मृत्यूंसाठी ठरवलंय जबाबदार; जाणून घ्या आणखी काय म्हटलं आहे?
Bangladesh’s ICT Chief Prosecutor demands the death penalty for Sheikh Hasina, alleging her role in the deaths of 1400 people — a shocking turn in the country’s political landscape.

Bangladesh’s ICT Chief Prosecutor demands the death penalty for Sheikh Hasina, alleging her role in the deaths of 1400 people — a shocking turn in the country’s political landscape.

esakal

Updated on

Sheikh Hasina Faces Death Sentence Demand: बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणच्या (ICT)  मुख्य अभियोक्त्यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर अत्यंत कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्यावर मागील वर्षी झालेल्या जनआंदोलनाच्या वेळी मानवतेविरुद्ध गुन्हा आणि सामूहिक हत्याकांड केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तसेच, अभियोक्ता मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी शेख हसीना यांना सर्व गुन्ह्यांच्या सूत्रधार म्हटले आणि त्यांच्यासाठी मृत्युदंडाची मागणी केली आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाच्या एका अहवालानुसार, १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान हसीना सरकारने दिलेल्या आदेशानंतर झालेल्या सुरक्षा दलाच्या कारवाईत सुमारे १४०० लोक मारले गेले होते.

 तर मुख्य अभियोक्ता ताजुल इस्लाम यांनी बांगलादेश न्यूज सर्व्हिसला सांगितले की, "शेख हसीना या सर्व गुन्ह्यांची सूत्रधार आहेत. ती एक निर्दयी गुन्हेगार आहे आणि तिच्या कृत्यांबद्दल तिला कोणताही पश्चात्ताप नाही. तिला जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे. मृत्युदंडाच्या बाबतीत तिच्यावर दया नसावी."

Bangladesh’s ICT Chief Prosecutor demands the death penalty for Sheikh Hasina, alleging her role in the deaths of 1400 people — a shocking turn in the country’s political landscape.
Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

एवढंच नाहीतर ताजुल इस्लाम यांनी पुढे असंही म्हटलं की, १४०० लोकांच्या हत्येसाठी तिला १४०० वेळा फाशी दिली गेली पाहिजे होती. परंतु हे शक्य नाही म्हणून कठोरातील कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात कुणीही आपल्याच देशातील लोकांना अशाप्रकारे मारणार नाही.

Bangladesh’s ICT Chief Prosecutor demands the death penalty for Sheikh Hasina, alleging her role in the deaths of 1400 people — a shocking turn in the country’s political landscape.
Jawed Habib FIR News : सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब विरुद्ध तब्बल ३२ 'FIR' दाखल!

तर दुसरीकडे शेख हसीना यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, हे आरोप सर्व राजकीय बदला घेण्याच्या भावनेतून करण्यात आलेले आहेत. तर, याबाबत शेख हसनी यांचा पक्ष अवामी लीग कडून अद्यापर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com