esakal | शिंजो अबे यांचा नवा विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

shinzo abe

जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे या देशाचे सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहणारे व्यक्ती ठरले आहेत. २०१२ च्या अखेरीस ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर आले होते. त्यानंतर ते सलग २७९९ दिवस या पदावर आहेत.

शिंजो अबे यांचा नवा विक्रम

sakal_logo
By
यूएनआय

टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे या देशाचे सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहणारे व्यक्ती ठरले आहेत. २०१२ च्या अखेरीस ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर आले होते. त्यानंतर ते सलग २७९९ दिवस या पदावर आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबतीत त्यांनी त्यांचे काका इसाकू सातो यांना मागे टाकले आहे. सातो यांनी १९६४ ते १९७२ या काळात जपानचे पंतप्रधानपद सांभाळले होते. शिंजो अबे यांची सुरवातीचा एक वर्षांचा कालावधी जमेस धरला तर ते गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे व्यक्ती ठरले होते.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top