
स्टॅवँजर : भारताचा १९ वर्षीय विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेश याने ६४ घरांच्या पटावर ऐतिहासिक चाल करत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याला आज पराभूत केले. गुकेश याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील क्लासिकल प्रकारात कार्लसन याच्यावर मात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.