D Gukesh
डोम्माराजू गुकेशचा जन्म २९ मे २००६ मध्ये चेन्नईत झाला. गुकेश हा इतिहासातील तिसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर आहे. ज्याला FIDE ने मार्च २०१९ मध्ये ग्रँडमास्टर पद दिले होते. बुद्धीबळात २७०० गुणांचे रेटिंग पूर्ण करणारा तो इतिहासातील तिसरा सर्वात लहान खेळाडू आहे,तर २७५० गुणांचे रेटिंग पूर्ण करणारा सर्वात लहान खेळाडू आहे. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी, वयाच्या सोळाव्या वर्षी, त्याने तत्कालीन जगज्जेता मॅग्नस कार्लसनला पराभूत केले होते आणि असा पराक्रम करणारा सर्वात लहान होता. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी, भारताच्या गुकेश डोम्माराजूने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला आणि जगातील सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन ठरला.