

आइस्क्रीममध्ये तुटलेलं बोट आढळल्याची घटना घडली होती. यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाच्या आइसक्रीममध्ये चक्क जिवंत साप आढळून आलाय. याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. थायलंडमध्ये हा प्रकार घडला असून व्हायरल होत असलेल्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक देत आहेत.