ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार, सिक्रेट सर्विसने वाचवला जीव; हल्लेखोर ताब्यात, VIDEO VIRAL

Washington DC Firing News अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी झालेल्या कार्यक्रमात बेछूट गोळीबाराची घटना घडलीय. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
Trump Event Sees Security Scare in Washington

Trump Event Sees Security Scare in Washington

Esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स सहभागी असलेल्या कार्यक्रमात गोळीबाराची घटना घडलीय. शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये बेछूट गोळीबार झाला. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सिक्रेट सर्विसच्या एजंटनी ट्रम्प यांच्यासह इतरांना घटनास्थळावरून सुरक्षित बाहेर काढलं. या गोळीबारात सुदैवाने कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com