राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला आंदोलकांचा वेढा; स्वत:ची सुटका करुन राजपक्षेंनी काढला पळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gotabaya Rajapaksa

राष्ट्रपती राजपक्षेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला आंदोलकांचा वेढा; स्वत:ची सुटका करुन राजपक्षेंनी काढला पळ

कोलंबो : ऐतिहासिक आर्थिक मंदीचा (Economic Crisis Sri Lanka) सामना करत असलेल्या श्रीलंकेतही (Sri Lanka) राजकीय अस्थिरता वेगानं पसरत आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (शनिवार) मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रपती राजपक्षे यांच्या निवासस्थानाला आंदोलकांनी वेढा घातल्यामुळं ते पळून गेल्याचं वृत्त एएफपी वृत्तसंस्थेनं दिलंय.

देशात शांतता-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निदर्शनं नियंत्रणात ठेवण्यासाठी शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून पश्चिम प्रांतातील अनेक पोलीस (Police) विभागात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. कर्फ्यूचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनानं दिलाय. गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात इंधनाअभावी जनतेचा संताप पहायला मिळतोय.

हेही वाचा: योगींचा विरोधकांना धक्का; द्रौपदी मुर्मू यांना सपा, बसपासह जनसत्ता दलाचा जाहीर पाठिंबा

पश्चिम प्रांतातील अनेक भागात संचारबंदी

श्रीलंकेच्या द कोलंबो पेज वृत्तपत्रानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम प्रांतातील नेगोंबो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लॅव्हिनिया, कोलंबो नॉर्थ, कोलंबो दक्षिण आणि कोलंबो सेंट्रल पोलिस विभागात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. कर्फ्यू भागात प्रवास करण्यास सक्त मनाई असून पोलिसांनी लोकांना इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. विशेष म्हणजे, गेल्या अनेक आठवड्यांपासून आर्थिक परिस्थितीमुळं तणाव वाढलाय. पेट्रोल पंपांवर नागरिक-पोलीस दलाचे सदस्य आणि सशस्त्र दल यांच्यात हिंसक चकमकी झाल्याच्या बातम्या आहेत. श्रीलंकेतील लोकांना इंधन मिळवण्यासाठी काही तास किंवा काही दिवस रांगेत उभं राहावं लागतंय. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा अनेक वेळा वापर केलाय.

Web Title: Sri Lanka President Gotabaya Rajapaksa Flees As Protesters Surround The Residence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..