
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत राज्यातील महत्वाकांक्षी मेकेदाटू जलाशय आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांसाठी तातडीने मंजुरी देण्याची विनंती केली. तसेच अल्पकालीन कृषी कर्ज मर्यादा निश्चित करण्यासाठी दहा हजार कोटींच्या आर्थिक मदतीचीही त्यांनी मागणी केली.