
सिंगापूरमध्ये १४ व्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात पुन्हा एकदा पीपुल्स एक्शन पार्टीनं एकहाती वर्चस्व मिळवलं. सलग १४व्या निवडणुकीत पक्षानं बाजी मारलीय. जगभरात व्यापारयुद्ध, राजकीय अस्थैर्य निर्माण झालं असताना सिंगापूरच्या जनतेनं त्यांच्या नव्या पंतप्रधानांना प्रचंड बहुमत दिलंय. सिंगापूर ७ ऑगस्ट १९६५ रोजी एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले. मात्र त्याआधीच १९५९ पासून देशात पीपुल्स एक्शन पार्टीची सत्ता आहे.