लिफ्टमध्ये चिमुकल्याच्या गळ्याला बसला फास पण... (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

- लहान बहिण-भाऊ लिफ्टमधून जात असताना चिमुकल्याच्या गळ्याला बसला फास. 

इस्ताम्बुल : आपण, आपल्या घरातील मुलं अनेकदा लिफ्टने ये-जा करत असतो. मात्र, मुलांचं लिफ्टमधून एकटं जाणं त्यांच्या जीवावर बेतू शकतं. अशाच प्रकारची घटना घडलीये तुर्केतील इस्ताम्बुलमध्ये. लहान बहिण-भाऊ लिफ्टमधून जात असताना चिमुकल्याच्या गळ्याला फास बसला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन चिमुकले दिसत आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) हा व्हिडिओ इस्तांबूलमधील असून, येथील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये ही घटना घडली. लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली. इस्तांबूलमध्ये एका इमारतीत राहणाऱ्या दोन लहान बहिण-भावांनी इमारतीमधील लिफ्टमध्ये प्रवेश केला. प्रवेश करत असतानाच यापैकी एका लहान मुलाभोवती एक दोरी गुंडाळली गेली होती. मात्र, त्यांचे त्याकडे लक्ष नव्हते. 

तसेच लिफ्ट सुरु झाल्यानंतर अचानकपणे ही दोरी मुलाच्या गळ्यापाशी आली आणि त्याला फास बसला. लिफ्ट जशी पुढे सरकरत होती, तसे या मुलाच्या गळ्याभोवतीचा फास जास्त आवळला जात होता. ही घटना घडताना घाबरलेल्या बहिणीने घटनेचे गांभीर्य दाखवून इमर्जन्सी बटण दाबले आणि पुढील अनर्थ टळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister saved the boy who got hang by toy rope inside an elevator in Istanbul