अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 6 भारतीयांना अटक 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

''होंडुरास, एल साल्वाडोर, मेक्सिको, ग्वाटेमाला, अर्जेंटिना, क्यूबा, नायजेरिया, भारत, चिली आणि तुर्कीतील नागरिकांना अटक करण्यात आली''. 

- 'आयसीई'तील अधिकारी

वॉशिंग्टन : अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि काही गुन्ह्यांत सहभागी असलेल्या लोकांविरोधात इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कडक पावले उचलली आहेत. यादरम्यान सुमारे 300 हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये 6 भारतीयांचा समावेश आहे.

'अमेरिकन इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट'मार्फत (आयसीई) 'एक्सक्लेझेशन कॅम्पेन' (ईआरओ) गेल्या महिन्यांपासून सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी येथील अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान अमेरिकेतील कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ह्युस्टन परिसरात राहणाऱ्या 45 लोकांना अटक केली होती. या अभियानादरम्यान अटक केलेल्या 6 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. याबाबत 'आयसीई'ने सांगितले, की ''होंडुरास, एल साल्वाडोर, मेक्सिको, ग्वाटेमाला, अर्जेंटिना, क्यूबा, नायजेरिया, भारत, चिली आणि तुर्कीतील नागरिकांना अटक करण्यात आली''. 

या अभियानादरम्यान अटक करण्यात आलेल्या काही लोकांविरोधात बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्यांवर खटला चालविण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Indians Among Those Arrested In Operation By US Immigration For Criminal Activity