बॉंबस्फोटात सहा अफगाण नागरिक ठार 

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जून 2020

गेल्या महिनाभरात अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. इस्लामिक स्टेटच्या कारवायांमुळे हल्ले वाढले आहेत. आठवड्यापूर्वी एका मशिदीमध्ये झालेल्या बॉंबस्फोटात मशिदीतील मौलवी ठार झाला होता.

काबूल : रस्त्याकडेला झालेल्या बॉंबस्फोटात रिक्षातून जाणारे सहा अफगाण नागरिक ठार झाले. ही दुर्घटना बुधवारी उत्तर प्रांतात घडली. या हल्ल्याची कोणत्याही संघटनेने अद्याप जबाबदारी घेतलेली नाही.

गृह मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक एरियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याकडेला ठेवण्यात आलेल्या बॉंबला एक रिक्षा धडकली. त्यामुळे हा स्फोट झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असावा, असे एरियन यांनी सांगितले.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गेल्या महिनाभरात अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. इस्लामिक स्टेटच्या कारवायांमुळे हल्ले वाढले आहेत. आठवड्यापूर्वी एका मशिदीमध्ये झालेल्या बॉंबस्फोटात मशिदीतील मौलवी ठार झाला होता, तर आठ जण जखमी झाले होते. इस्लामिक स्टेटने शिया मुस्लिमांविरोधात युद्ध जाहीर केले होते, पण त्यांनी सुन्नी मुस्लिम आणि त्यांच्या मशिदींनाही लक्ष्य बनवले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six killed in roadside bomb in northern Afghanistan