शाळा-महाविद्यालये सुरू होताच कोरोनाचा विस्फोट...

वृत्तसंस्था
Wednesday, 19 August 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. लॉकडाऊननंतर काही देशांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, विद्यार्थी एकत्र आल्यानंतर कोरोनाचा विस्फोट झाला आणि 200 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली.

वॉशिंग्टन: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. लॉकडाऊननंतर काही देशांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, विद्यार्थी एकत्र आल्यानंतर कोरोनाचा विस्फोट झाला आणि 200 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर दोन हजार विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अमेरिकेत ही घटना घडली असून, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.  

दुकानदाराच्या 'ऑफर'नंतर खरेदीसाठी गर्दी; पण...

चीनमधून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका अमेरिका, स्पेन, इटली, ब्राझील या देशांना बसला आहे. यानंतर या देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पण, काही महिन्यांच्या कालावधीनंतर लॉकडाऊन शिथील करण्यात आला आणि शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आली. पण, कोरोना पुन्हा डोके वर काढल्याने खळबळ उडाली. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने शाळा-महाविद्यालये सुरू केल्यानंतर कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अमेरिकेत 3 ऑगस्ट रोजी शाळा व महाविद्यालये पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात आली. यानंतर एकूण 6 विद्यापाठीतील 200 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, 2000 विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

भिक्षेतून मिळवलेली रक्कम कोरोना रुग्णांसाठी दान...

अमेरिकेतील आयोवा विद्यापीठात 175 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नॉट्रेडम विद्यापीठात 80 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. जॉर्जियाच्या चेरोकी काउंटी स्कूलमधील सर्वाधिक 1100 मुलांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेत 56 लाखाहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 43 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शिवाय, 1358 जणांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six university campuses recorded more than 200 positive students at usa