लाइव्ह कार्यक्रमात लगावली कानशिलात

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीच्या लाइव्ह कार्यक्रमात एका पक्षाच्या नेत्याने दुसऱ्या नेत्याच्या कानशिलात लगावली. राजकिय मतभेद कुठल्या टोकाला जाऊ शकातात याचे एक उदाहरण पाकिस्तानी जनतेने पाहिले. 'पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ' पक्षाचे नईम-उल-हक यांनी 'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज' पक्षाच्या दानियाल अजीज यांच्या कानशिलात लगावली. 

जीओ न्यूज या वृत्तवाहीनीवरील 'आपस की बात' या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांना चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. चर्चे दरम्यान झालेल्या वादातून दानियाल अजीज हे नईम-उल-हक यांना चोर म्हणाले. या रागातून हा प्रकार घडला. नईम-उल-हक पाकिस्तान खाजगीकरण मंत्री आहेत. कार्यक्रमात झालेला गोंधळ शांत करण्यासाठी वृत्तवाहीनीचे निवेदक मुनीब फारुक यांनी दोघांची समजूत काढून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानात यावर्षी निवडणूका होणार आहेत. 

Web Title: slaped in live tv show program