

Indian Flydubai Captain Smit Machchhar, who helped control the aircraft during a mid-air emergency following an attack on the co-pilot
esakal
दुबईहून तेल अवीवकडे निघालेल्या फ्लायदुबईच्या विमानात बुधवारी (३० सप्टेंबर) धक्कादायक प्रकार घडला. विमान हवेत असताना एका पायलटने दुसऱ्या पायलटवर चाकूने हल्ला केला. या वेळी विमानाचे नियंत्रण भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्याकडे होते. कॉकपिटमध्ये झालेल्या हिंसक झटापटीदरम्यान त्यांनी हल्लेखोर सह-पायलटचा प्रतिकार करत विमानावरील नियंत्रण कायम ठेवले. त्यानंतर वेगाने खाली येणाऱ्या विमानाला सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.