esakal | पृथ्वीवर आदळणार सोलार वादळ; मोबाईल सिग्नल, GPS होणार प्रभावित
sakal

बोलून बातमी शोधा

global

सोलार वादळामुळे वीज पुरवठा, मोबाईल टॉवर यासह जीपीएस सुविधा प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पृथ्वीवर आदळणार सोलार वादळ; मोबाईल सिग्नल, GPS होणार प्रभावित

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

Solar storm heading towards Earth नवी दिल्ली- सूर्यापासून निघालेले एक वादळ पुढील काही तासांत पृथ्वीपर्यंत पोहोचणार आहे. अमेरिकेची अवकाश संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासाने अंदाज लावलाय की, हे वादळ रात्री उशीरापर्यंत पृथ्वीवर आदळेल. या सोलार वादळामुळे वीज पुरवठा, मोबाईल टॉवर यासह जीपीएस सुविधा प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Solar storm heading towards Earth likely to hit impact GPS mobile signal)

स्पेसवेदर डॉट कॉमने सांगितलं की, वादळ पृथ्वीवर आदळल्यानंतर सूंदर असा प्रकाश दिसेल. हा प्रकाश दक्षिण पोलमध्ये राहणाऱ्या लोकांना रात्रीच्या वेळी पाहता येईल. या सोलार वादळामुळे हाय-फ्रिक्वेंसी रेडिओ सेवा जवळपास एक तासासाठी बंद राहू शकते. 3 जुलैला पहिल्यांदा या वादळाबाबत कळालं होतं. हे वादळ 1 सेंकदात 500 किलोमीटर, इतक्या प्रचंड गतीने पृथ्वीकडे मार्गक्रमण करत आहे. या वादळामुळे पृथ्वीच्या वरच्या भागात असणाऱ्या सॅटेलाईटवरही प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे जीपीएस नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाईट टीव्ही प्रभावित होऊ शकतात.

हेही वाचा: तिसरी लाट अटळ, निर्बंधातून सूट नको; IMA चा सरकारला सल्ला

सोलार वादळ काय आहे?

पृथ्वीभोवती असणारी मॅग्नेटिक फिल्ड सूर्यापासून येणाऱ्या धोकादायक किरणांपासून आपले संरक्षण करते. सूर्यापासून आलेले प्रत्येक किरण सर्वात आधी मॅग्नेटिक फिल्डला धडकतात. अशावेळी 6 ते बारा तासांसाठी पृथ्वीच्या मॅग्नेटिक फिल्डमध्ये घट होते. त्यानंतर मॅग्नेटिक फिल्ड पूर्वपदावर येते.

ब्रह्मांडच्या सुरुवातीला सूर्यावर वादळ येणं सर्वसाधारण होते. जीवनाच्या उत्पत्तीमध्ये अशा वादळांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं सांगितलं जातं. 4 अब्ज वर्षांपूर्वी सूर्य आजच्या पेक्षा चार पटीने कमी चमकदार होता. पण, सूर्यावर होणाऱ्या घर्षनामुळे विकिरण निर्माण झाले. अशाप्रकारच्या मोठ्या स्फोटांमुळे पृथ्वीला गरम राहण्यासाठी आवश्यक उर्जा मिळाली.

loading image