esakal | तिसरी लाट अटळ, निर्बंधातून सूट नको; IMA चा सरकारला सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. कधी 3 लाखांच्या पुढे आढळणारी कोरोना रुग्णसंख्या आता 50 हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे.

तिसरी लाट अटळ, निर्बंधातून सूट नको; IMA चा सरकारला सल्ला

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. कधी 3 लाखांच्या पुढे आढळणारी कोरोना रुग्णसंख्या आता 50 हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. पण, इंडियन मेडिकल असोसियशनने (Indian Medical Association) दिलेल्या एका इशाऱ्यामुळे चिंता वाढणार आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे आणि ती लवकरच येईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी इतक्यात कोरोना निर्बंधातून सूट देऊ नये, अशा इशारा इंडियन मेडिकल असोसियशनने दिला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (IMA says 3rd wave of COVID inevitable appeals to states to not lower guard)

कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे आणि कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. असे केल्यानेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल, असं आयएमएने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जागतिक पुरावे आणि महामारीचा इतिहास पाहता तिसरी लाट नक्की येणार आहे. पण, आता आपल्या पाठीशी दोन लाटांना हाताळण्याचा अनुभव आहे, असंही आयएमएने म्हटलं.

हेही वाचा: लर्निंग लायसन्सच्या परीक्षेसाठी मराठीत व्हिडिओ उपलब्ध

गेल्या जवळपास दीड वर्षांपासून कोरोना महामारी जगावर थैमान घालत आहे. जगाने कोरोना विषाणूच्या दोन लाटा पाहिल्या आहेत. आता तिसरी लाट येऊ पाहत आहे. ती अनिवार्य आहे. पण, मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला लस देऊन आणि कोरोना निर्बंधांचे पालन करुन आपल्याला तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल. यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे, असं रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय.

हेही वाचा: अपार्टमेंटधारकांना आता क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स द्यावा लागणार

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लोकांनी तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. लोकांनी गर्दी करणे टाळावे. पर्यटन, धार्मिक उत्सव असे कार्यक्रम आवश्यक असले तरी ते काही महिने पुढे ढकलता येतील. धार्मिक उत्सवांना परवानगी दिल्याने मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील. असे कार्यक्रम कोरोनाचे 'सुपरस्प्रेडर इव्हेंट' ठरु शकतात. त्यामुळे तिसऱ्या लाटेला निमंत्रण दिल्यासारखं होईल, असं आयएमएने म्हटलं आहे. सरकारने आणखी तीन महिने कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करावे आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

loading image