जीव गमावणारे सैनिक लुझर असतात! ट्रम्प यांच्या वक्तव्याने नवा वाद

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 5 September 2020

अध्यक्षपदाची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

वॉशिंग्टन- अध्यक्षपदाची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे. जीव गमावणारे सैनिक लुझर असतात, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्याचे एका मासिकाने म्हटले आहे. अर्थात ट्रम्प यांनी हे वक्तव्य नाकारले असून अशाप्रकारे सैनिकांना अपमानित करणारे वक्तव्य आपण कधीही केले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. जुना मुद्दा उकरून विरोधक वाद निर्माण करत असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. हे वक्तव्य अटलँटिक नावाच्या मासिकाने प्रसिद्ध केले आहे. 

भारतीय महिलांबद्दल गलिच्छ वक्तव्य; अमेरिकेच्या माजी अध्यक्षाचा भारतद्वेष...

ॲटलँटिक मासिकाच्या मते, ट्रम्प यांनी युद्धात मारले गेलेल्या सैनिकांना लुझर (हरलेले) असे म्हटले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प हे बऱ्याच काळापासून स्वत:ला सैनिकांचे चॅम्पियन म्हणून सांगत आले आहेत. तसेच त्यांनी सैन्यदळ आणखी मजबूत करण्यावर भर दिला आहे. मात्र आता मृत सैनिकांसाठी कथित रुपाने ‘हरलेला’ हा शब्द वापरल्याने डेमोक्रॅटिक आणि अन्य विरोधकांचा टीकेचा सामना करावा लागत आहे. 

डेमाक्रॅटिकचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, माझा मुलगा बियू बायडेन हा इराकमध्ये होता. तो हारला नाही. २०१५ मध्ये त्याचा मेंदुच्या कर्करोगाने निधन झाले. जर आपला मुलगा सध्या अफगाणिस्तानात असता तर कसे वाटले असते. आपण मुलगा, मुलगी किंवा पत्नीला गमावले तर आपल्याला कसे वाटेल, असा प्रश्‍न बायडेन यांनी उपस्थित केला आहे. ट्रम्प यांचे विधान अपमानजनक आणि खालच्या स्तरावरचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आतापर्यत कधीही झालो नव्हतो, एवढा हताश आपण या वक्तव्याने झालो आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

माणसांसाठी लस कधी? माकडानंतर उंदरावरही लशीचा यशस्वी प्रयोग

ट्रम्प यांच्याकडून वक्तव्याचा इन्कार

दुसरीकडे ट्रम्प आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते, आपण सैनिकांविषयी हारणारे हा शब्दप्रयोग कधीही केला नाही. ही बनावट कहानी आहे. अशा प्रकारचा आरोप लोक कसे करु शकतात. माझ्यासाठी सैनिक हे खऱ्या अर्थाने हीरो आहेत, असे ट्रम्प यांनी नमूद केले आहे. 

ॲटलँटिक मासिकाने काय लिहले

ॲटलॅटिंक मासिकाच्या एका लेखानुसार ट्रम्प २०१८ रोजी फ्रान्सला गेले होते. त्यावेळी त्यांनी पहिल्या महायुद्धात मारले गेलेल्या अमेरिकी सैनिकांच्या स्मारकाला भेट दिली नाही. तेव्हा पाऊस पडत होता. हवामान खराब असल्याने ते स्मारकाला जावू शकले नाही, असे अमेरिकी नौदलाने स्पष्ट केले होते. परंतु मासिकाने केलेल्या आरोपानुसार, ट्रम्प यांनी एका अधिकाऱ्याजवळ मी त्या स्मारकाला का भेट देऊ, असा प्रश्‍न केला. तेथे तर लुजर्स (पराभूत झालेले) आहेत. यावेळी केवळ तेथे चार जण उपस्थित होते. मात्र त्या लेखात चौघांचे नाव सांगितलेले नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldiers who lose their lives are losers said donald Trump us election