Somalia Blast : सोमालियात दोन कारमध्ये मोठा स्फोट, 9 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Blast

Somalia Blast : सोमालियात दोन कारमध्ये मोठा स्फोट, 9 जणांचा मृत्यू

Somalia Blast : पूर्व आफ्रिकन देश सोमालियामध्ये मोठा स्फोट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. याबाबत एएफपीने ट्वीट केले आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाची तीव्रता पाहता मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हा स्फोट नेमका कसा झाला किंवा कुणी केला याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा: Rishabh Pant Update : पंतच्या हेल्थबाबत मोठी अपडेट; उपचारांसाठी मुंबईत हलवणार

स्थानिक सुरक्षा अधिकारी अब्दुल्लाही अदान यांनी एएफपीला सांगितले की, "दहशतवाद्यांनी आज सकाळी स्फोटकांनी भरलेल्या वाहनांनी महास शहरावर हल्ला केला." या स्फोटांमध्ये नऊ लोक ठार झाले आहेत.

टॅग्स :deathcarblast