
नवी दिल्ली : ‘‘कोणीतरी तुमच्यावर नाखूश आहे, मात्र त्यातून निर्माण होणार तणाव सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. असे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले आहे,’’ अशी माहिती फिजीचे पंतप्रधान सिटिवेनी राबुका यांनी दिली. मंगळवारी भारतीय जागतिक व्यवहार परिषदेच्या (आयसीडब्लूए) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ओशन आॅफ पीस’ या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना राबुका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर राबुका यांच्या विधानाकडे पाहिले जात आहे.