‘लॉकडाउन पार्टी’बद्दल माफ करा : बोरीस जॉन्सन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Boris Johnson

‘लॉकडाउन पार्टी’बद्दल माफ करा : बोरीस जॉन्सन

लंडन : लॉकडाउनच्या काळात आयोजित केलेल्या पार्टीला हजर राहिल्याबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आज अखेर माफी मागितली. मात्र, नियमांचा भंग होत आहे असे त्यावेळी जाणवले नाही आणि संसदेचीही आपल्याला दिशाभूल करायची नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना संसर्गस्थितीमुळे लॉकडाऊन लागू असताना जून २०२० मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याच सरकारी निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीबाबत जॉन्सन यांना पूर्वकल्पना नसली तरी नंतर ते यामध्ये सहभागी झाले होते. या प्रकरणी नियमभंग झाल्याबद्दल त्यांनी गेल्याच आठवड्यात ५० पौंडांचा दंडही भरला.

यामुळे पदावर असताना कायद्याचा भंग करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०२० आणि २०२१ मध्ये कार्यालयातही पार्टी केल्याचा आरोप असून त्याबाबत पोलिस तपास करत आहेत. जॉन्सन यांनी पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीनेही दरम्यानच्या काळात जोर धरला होता. आज लोकप्रतिनिधीगृहात बोलताना जॉन्सन यांनी सभागृहाची आणि जनतेची माफी मागितली.

Web Title: Sorry About Lockdown Birthday Party Held During Lockdown Boris Johnson

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top