
America Earthquake: दक्षिण अमेरिकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.० इतकी मोजण्यात आली. रिपोर्टनुसार ड्रेक पॅसेज परिसरात भूकंपाचे हे धक्के बसले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दरम्यान कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त समोर आलेले नाही. ड्रेक पॅसेज हा एक खोल आणि रुंद सागरी मार्ग आहे, जो नैऋत्य अटलांटिक महासागर आणि आग्नेय प्रशांत महासागराला जोडतो.