
दक्षिण कोरियाच्या तुरुंगात असणाऱ्या माजी राष्ट्रपती युं सुक येओल यांची पत्नी किम केओन यांना स्टॉक घोटाळा आणि लाचखोरीसह अनेक आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. एएफपी वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण कोरियाच्या सरकारी वकिलांनी माजी फर्स्ट लेडीला अटक केल्याची माहिती दिलीय. दक्षिण कोरियात माजी राष्ट्रपतींना दोषी ठरवण्याचा आणि तुरुंगात डांबण्याचा इतिहास जुनाच आहे. पण इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी राष्ट्रपतीसह त्याच्या पत्नीलासुद्धा तुरुंगात डांबण्यात आलंय.