Stamped South Korea: हॅलोविन पार्टीत चेंगराचेंगरी; 50 जणांना हृदयविकाराचा झटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stamped South Korea

Stamped South Korea: हॅलोविन पार्टीत चेंगराचेंगरी; 50 जणांना हृदयविकाराचा झटका

सेऊल: दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. सेऊलमध्ये एका हॅलोवीन पार्टीदरम्यान ही चेंगराचेंगरी झाली. यावेळी किमान 50 जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रचंड गर्दीमुळे 81 जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. ज्यामुळे हार्ट अटॅक सारख्या समस्या निर्माण झाल्या. तब्बल 100,000 लोक कोरोनाच्या साथीनंतर प्रथमच आउटडोअर नो-मास्क हॅलोविन इव्हेंट साजरा करत होते.

हेही वाचा: Nokia G60 5G: लवकरच भारतात येतोय Nokia चा 5G फोन, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

आपत्कालीन अधिकार्‍यांना इटावन भागातील लोकांकडून किमान 81 कॉल आले आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. नॅशनल फायर एजन्सीचे अधिकारी चोई चेओन-सिक यांनी सांगितले की, सुमारे 100 लोक जखमी झाले आहेत, डझनभर लोकांना हृदयविकाराचा झटका आला आहे.

टॅग्स :South Korea