दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले असून 170 जणांचा मृत्यू झाला आहे. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरल्याने मोठा अपघात झाला. दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले. .मीडिया रिपोर्टनुसार म्हटले आहे की जेजू एअरचे विमान 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट्स घेऊन थायलंडहून परतत होते आणि लँडिंग दरम्यान क्रॅश झाले. विमानतळ दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात आहे. स्थानिक मीडियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये विमानातून धूर निघताना दिसत आहे..विमानतळाच्या कंपाऊंडला धडकल्यानंतर विमानाला आग लागली. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. मुआन विमानतळावर बचावकार्य सुरू आहे. जेजू एअरचे फ्लाइट क्रमांक 2216 बँकॉकहून दक्षिण कोरियाला परतत होते. विमानाला आग लागल्यानंतर आकाशात धुराचे मोठे लोट पसरले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..बचाव पथकाने विमानाच्या मागील भागातून प्रवाशांना बाहेर काढले आहे. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमानतळावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण कोरियाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष चोई संग-मू यांनी या विमान अपघातावर शोक व्यक्त केला आहे..मुआन विमानतळावर तातडीने बचाव कार्य आणि सर्व बचाव प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष हान डुक-सू यांच्यावर महाभियोग लावण्यात आल्यानंतर चोई संग-मू यांना शुक्रवारी देशाचे अंतरिम नेते बनवण्यात आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.