
दक्षिण सुदानच्या युनिटी स्टेटमध्ये विमान कोसळले. या विमानात २१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या अपघातात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. युनायटेड नेशन्स रेडिओ मिरायाच्या रिपोर्टनुसार, हे विमान दक्षिण सुदानमधील तेलक्षेत्रातून उड्डाण करत होते. दक्षिण सुदानचे माहिती मंत्री मायकल माकुई यांनी या भीषण विमान अपघाताबाबत कोणतीही तत्काळ प्रतिक्रिया दिली नाही.