
दक्षिण नायजेरियात पेट्रोल टँकरचा स्फोट होऊन १८ जण ठार तर १० जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सने शनिवारी संध्याकाळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण-पूर्व राज्यातील एनुगु-ओनित्शा एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. जेव्हा पेट्रोलने भरलेल्या टँकरचे नियंत्रण सुटले आणि १७ वाहनांना आदळल्यानंतर आग लागली.