मोठी झेप! मस्क यांच्या SpaceX मुळे सर्वसामान्य नागरिक पोहोचले अवकाशात

हे चार पर्यटक तीन दिवस अवकाशात राहणार आहेत.
SpaceX
SpaceX

वॉशिंग्टन: मागच्या काही वर्षांपासून आपण नुसती अवकाश पर्यटनाची (space tourism) चर्चा ऐकत आहोत. आता हे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. आता त्या दिशेने एलन मस्क (Elon musk) यांच्या स्पसेएक्स (Spacex) कंपनीने महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. स्पेस एक्सच्या फाल्कन ९ रॉकेटने बुधवारी फ्लोरिडाच्या केनडी स्पेस सेंटरमधुन (Kennedy Space Center) चार पर्यटकांना घेऊन अवकाशाच्या दिशेने यशस्वी झेप घेतली.

ही अशी पहिली मोहिम आहे, जिथे कोणीही अवकाश संशोधक, वैज्ञानिक किंवा पारंगत अवकाशवीर नाहीय. सर्वसामान्य नागरिकच क्रू सदस्य असून त्यांना अवकाशात पाठवण्यात आले आहे. स्पेस एक्सच्या या यानाला इन्स्पिरेशन ४ रॉकेट असे नाव देण्यात आले आहे. हे चार पर्यटक तीन दिवस अवकाशात राहणार आहेत.

SpaceX
कोण आहेत ते चौघे? अंतराळवीर नसूनही पैशाच्या जोरावर झेपावले अंतराळात

"याआधी काहीजण अवकाशात गेले आहेत. यापुढे अनेकजण अनुकरण करतील" असे या मोहिमेचा सर्व खर्च उचलणारे अब्जाधीश जेअर्ड इसॅकमॅन यांनी सांगितले. स्पेसएक्सचे स्पेसशीप आंतरराष्ट्रीय अवकाश तळाच्याही पुढे आत खोलवर जाणार आहे. हे सर्व अवकाशवीर अमेरिकन असून तीन दिवस अवकाश भ्रमंती केल्यानंतर पृथ्वीवर परतल्यानंतर ते फ्लोरिडाच्या तटावर उतरतील.

SpaceX
सीईटी परीक्षेत आष्टीचा अभिषेक घोडके राज्यात प्रथम

जेअर्ड इसॅकमॅन यांना या मोहिमेसाठी किती खर्च येणार आहे, ते स्पेसएक्सने उघड केलेले नाही. स्पर्धेच्या माध्यमातून इसॅकमॅन यांनी अवकाश सफरीसाठी चौघांची निवड केली. नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंट्रीच्या रुपात त्यांच्या कथा उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com