esakal | जगावर घोंघावतंय आणखी एक मोठं संकट; 5 कोटी लोकांचा गेला होता जीव

बोलून बातमी शोधा

deaths}

कोरोना महामारीचा हाहाकार अजूनही सुरुच आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच मृतांचा आकडाही वाढत आहे.

जगावर घोंघावतंय आणखी एक मोठं संकट; 5 कोटी लोकांचा गेला होता जीव
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना महामारीचा हाहाकार अजूनही सुरुच आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच मृतांचा आकडाही वाढत आहे. एका संकटातून जग सुटत नाही तोच जागतिक आरोग्य संघटेनेने नव्या संकटाचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांची चिंता वाढणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी इशारा दिलाय की, स्पॅनिश फ्लू  (Spanish Flu) पुन्हा जगात पसरु शकतो. जवळपास 100 वर्षांपूर्वी आलेल्या फ्लूमुळे जगातील 5 कोटी लोकांचा जीव गेला होता. WHO च्या प्रमुख तज्ज्ञांनी इन्फ्ल्यूएंजासंबंधी इशारा दिला असून पुढील महामारी स्पॅशिन फ्लू असू शकते असं म्हटलं आहे. त्यामुळे जगासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं मानलं जातंय. 

ब्रिटनचे वृत्तपत्र द सनच्या रिपोर्टनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल इन्फ्ल्यूएंजा सर्विलंस अँड रिस्पॉंस सिस्टिमचे मुख्य सदस्य डॉ. जॉन मॅककोली (Dr John McCauley) यांनी सांगितलं की, सामान्य फ्लूचे व्हायरसमध्ये परिवर्तन झाल्यास महामारी अधिक घातक होऊ शकते. जगभरात कोरोना महामारीचा धुमाकुळ सुरु आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांनी अशा प्रकारच्या दुसऱ्या व्हायरसचा शोध सुरु केला आहे. डॉ. जॉन मॅककोली यांनी यावेळी साधारण फ्लू संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. त्याचं म्हणणं आहे की फ्लूचा स्ट्रेन भविष्यात होणाऱ्याला महामारीला कारणीभूत ठरु शकतो. 

मुख्यमंत्र्यांचे टोलेबाज भाषण; 'हा व्हायरस आहे, पुन्हा येईन पुन्हा येईन...

लोकांची कमी होणारी इम्युनिटी चिंतेचा विषय

डॉ. मॅककोली यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचे उपाय जसे की शारीरिक अंतर आणि नियमित हात धुणे यामुळे फ्लूचे मोठ्या प्रमाणात सर्क्युलेशन होणार नाही. पण, कोरोनानंतर जगामध्ये सीजनल फ्लूसारखा व्हायरस अधिक धोकादायक होऊ शकतो. लोकांची कमी होणारी इम्युनिटी यामागचं प्रमुख कारण आहे. त्यांनी सांगितलं ब्रिटनमध्ये पहिला इशारा देण्यात आला आहे. थंडीच्या दिवसात फ्लूच्या प्रकरणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

मस्कच्या गर्लफ्रेंडचे डिजीटल आर्टवर्क; 20 मिनिटांतच 5.8 दशलक्ष डॉलरला विक्री

स्पॅनिश फ्लूसाठी तयार रहावं जगाने

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, फ्लूमुळे संक्रमित झालेल्या लोकांच्या मृत्यूची जास्त शक्यता आहे. १९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूमुळे जगातील एक तृतीयांश लोकसंख्या संक्रमित झाली होती. हा फ्लू पक्षांकडून आला होता. या फ्लूमुळे जवळपास ५ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. ही संख्या पहिल्या महायुद्धात मेलेल्या लोकांपेक्षा अधिक आहे. मॅककोली यांनी यासाठी तयार रहाण्यास सांगितलं आहे.