मुख्यमंत्र्यांचे टोलेबाज भाषण; 'हा व्हायरस आहे, पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणतो'

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 3 March 2021

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण सुरु केले असताना विरोधकांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई- विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण सुरु केले असताना विरोधकांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांना थयथयाट पाहून मला नटसम्राट आठवला, असा बोचरा वार उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानांही त्यांनी टोला लगावला. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. हा व्हायरस आहे, मी पुन्हा येईल, पुन्हा येईल असं म्हणतो. त्यामुळे काळजी घ्या. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, हे सत्य आहे. सरकारने एकही कोरोना रुग्ण लपवलेला नाही. सर्व माहिती जनतेसमोर मांडली आहे, असं ते म्हणाले. सरकारने 'मी जबाबदार' मोहीम सुरु केली आहे. सरकार आवश्यक ती खबरदारी घेत आहे. देशातील सर्वात मोठे कोविड सेंटर आपण सुरु केलंय. जम्बो सेंटरमध्ये कितीजण ठीक झाले, हे पण पाहावं. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशा सुविधा नव्हत्या. त्या आपण वाढवल्या. आताही संपूर्ण औषधं, सुविधा नाहीत. पण, आपण लढतो आहोत. सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. राज्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू लपवलेला नाही. एकही कोरोना रुग्ण लपवलेला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

कोरोना काळात त्रिसूत्री पाळायला हवीच. कोरोनासाठीचा राज्याचा फंड दिल्लीला देण्यात आला आहे. कोरोना काळात सरकारनं खूप काम केलं. या काळात उभारण्यात आलेल्या वैद्यकीय सुविधा आपली उपलब्धी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना काळात स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला आधी काम करणारी छाती लागते. मी बंद दाराआड कधी खोटेपणा केला नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. विरोधकांना थयथयाट पाहून मला नटसम्राट आठवला, असा बोचरा वारही त्यांनी केला. 

'आयुष्यात खोटं बोललो नाही, बोलणार नाही'; विधिमंडळात मुख्यमंत्री गरजले!

कोरोनाचा विषाणू भेदाभेद करत नाही. त्याची थट्टा करु नका. कोरोना सत्ताधारी-विरोधक ओळखत नाही. कोरोना काळात लोकांना 5 रुपयात शिवभोजन थाळी दिली. विरोधकांनी आरोप करण्याआधी विचार करायला हवा, असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पेट्रोल-डिझेलच्या किंमती इतक्या का वाढल्या आहेत, असा सवाल त्यांनी केला. देशाच्या सीमेवर कुंपन असावं, पण शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी कुंपणं लावण्यात आले आहेत. सरदार पटेलांचं नाव असणाऱ्या स्टेडियमला मोदींचे नाव का दिले, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Legislative Assembly Session shivsena cm uddhav thackeray criticize bjp devendra fadanvis