रशियाची लस ९१.६ टक्के प्रभावी

Sputnik-V-Russian-vaccine
Sputnik-V-Russian-vaccine

मॉस्को - स्पुटनिक व्ही ही कोरोनावरील रशियन लस प्रयोगशाळेतील अंतिम टप्प्यातील चाचण्यांत ९१.६ टक्के परिणामकारक ठरल्याचे तज्ज्ञांच्या परिक्षणात आढळून आले.

लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलने हे वृत्त दिले आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांबाबतच्या या आश्वासक वृत्तामुळे जागतिक साथीविरुद्ध आणखी एक अस्त्र मिळाले आहे. त्याचवेळी अंतिम आकडेवारी तयार होण्यापूर्वीच लसीचा वापर सुरु करण्याच्या रशियाच्या निर्णयाचेही काही प्रमाणात समर्थन झाले आहे.

मॉस्कोतील गामालेया इन्स्टिट्यूटने ही रस विकसित केली आहे. सप्टेंबरपासून सुरु असलेल्या चाचण्यांमधील आकडेवारीशी हे निष्कर्ष सुसंगत आहेत.

गामालेयाच्या डेनिस लोगूनोव यांच्या नेतृत्वाखाली लस विकसित करण्यात आली. त्यात १९ हजार ८६६ स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली. चाचणी सुरु झाल्यापासून लस मिळालेल्या १६ जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. प्लॅसेबो देण्यात आलेल्या ६२ जणांना हा त्रास झाला. हे अपवाद सोडल्यास दोन डोसची लस लक्षणीयरित्या परिणामकारक ठरली.

निकाल शास्त्रीय सिद्धांतांना धरून 
लॅन्सेटमध्ये रीडिंग विद्यापीठाचे प्रा. इयन जोन्स आणि लंडन स्कूल ऑफ हायजिन-ट्रॉपिकल मेडिसीन येथील प्रा. पॉली रॉय यांचे मत देण्यात आले आले. त्यांनी म्हटले आहे की, अकारण घाई, सोपा व स्वस्त मार्ग तसेच पारदर्शकतेचा अभाव यामुळे रशियावर टीका झाली होती, मात्र त्यांनी जाहीर केलेले निकाल सुस्पष्ट आणि शास्त्रीय सिद्धांतांना धरून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com