चिनी गुंतवणुकीच्या जाळ्यात श्रीलंका ? पुन्हा ड्रॅगनकडेच मदतीची याचना | Sri Lanka In Financial Crisis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinese President Xi Jinping And Sri Lankan President Gotabaya Rajapaksa

चिनी गुंतवणुकीच्या जाळ्यात श्रीलंका ? पुन्हा ड्रॅगनकडेच मदतीची याचना

कोलंबो : श्रीलंका सात दशकांत पहिल्यांदाच मोठ्या आर्थिक संकटाशी तोंड देत आहे. वृत्तांनुसार श्रीलंकन सरकारांनी नेहमी अनेक बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सध्याची स्थिती निर्माण झाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार उत्तम पायाभूत सुविधा, चांगला रोजगार, उत्पन्न, आर्थिक स्थिरता आदींच्या आशेवर श्रीलंकेने (Sri Lanka) चिनी परदेशी गुंतवणुकीच्या समोर गुडघे टेकले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे राहणीमान पातळी उंचावली आहे. मात्र श्रीलंकेला अनेक वर्षे कर्ज आणि आश्रित ठेवण्याचे चीनच्या गुप्त हेतूंकडे वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. (Sri Lank Traps In Chinese Investment)

हेही वाचा: श्रीलंका संकटात ! नागरिकांना मिळेना पेट्रोल, कागद नसल्याने परीक्षा रद्द

जानेवारीत श्रीलंकेने मागितली होती चीनकडे मदत

श्रीलंकेवर २०२२ मध्ये जवळपास ७ बिलियन डाॅलरचे परकीय कर्ज आहे. त्यात जुलै २०२१ मध्ये १ बिलियन डाॅलरच्या बाँडचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावरील चिनी गुंतवणुकी व्यतिरिक्त देश आपल्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. सध्याचे संकट पाहाता राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी या वर्षी जानेवारीत श्रीलंकेच्या दौऱ्यावर आलेले चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याकडे कर्जाचे पुनर्गठन करण्याची विनंती केली होती.

हेही वाचा: व्लादिमीर पुतीन यांना विष देऊन मारण्याचा कट, १००० कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ

भारत आणि श्रीलंकेत करार

कोलंबोकडून नवी दिल्लीकडे अब्जो डाॅलरचे क्रेडिट लाईन प्राप्त करण्याच्या काही दिवसानंतर, श्रीलंकेने चीनकडून २.५ अब्ज डाॅलरसाठी एक नवीन कर्ज आणि खरेदीदाराचे क्रेडिट मागितले आहे. कारण श्रीलंकेला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे. राजपक्षे सरकार काही दिलाशासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करित आहे. श्रीलंकेतील चीनचे (China) राजदूत क्यूई जेनहोंग म्हणाले, की चीन १ अब्ज डाॅलरचे कर्ज आणि १.५ अब्ज डाॅलरचे क्रेडिट लाईनसाठी श्रीलंकेकडे एक नवीन प्रस्तावावर विचार करित आहे.

Web Title: Sri Lank Traps In Chinese Investment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..