esakal | श्रीलंका बॉम्बस्फोटात आत्मघाती दहशतवाद्यांचा नेता ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka attack leader died in hotel bombing  authorities say

श्रीलंका बॉम्बस्फोटात आत्मघाती दहशतवाद्यांचा नेता ठार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलंबो: श्रीलंकेतील नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) या स्थानिक मुस्लिम मूलतत्त्ववादी गटाचा प्रमुख असलेला झहराम हशीम हा साखळी बॉंबस्फोट घडवून आणणाऱ्या आत्मघाती दहशतवाद्यांचा नेता होता. ईस्टर संडेच्या दिवशी कोलंबोतील शांग्री-ला हॉटेलमध्ये झालेल्या आत्मघाती बॉंबस्फोटात हशीम ठार झाल्याची माहिती अध्यक्ष सिरिसेना यांनी आज (शुक्रवार) दिली.
 
हशीम आणि त्याचा सहकारी इल्हाम अहमद इब्राहीम या दोघांनी शांग्री-ला हॉटेलमध्ये आत्मघाती बॉबस्फोट घडवून आणल्याचे सिरिसेना यांनी सांगितले. लष्कराच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेली माहिती घटनास्थळाजवळच्या सीसीटीव्ही फुटेजमधून या माहितीला दुजोरा मिळाला असल्याचे सांगण्यात आले. मुस्लिम धर्मगुरू असलेला हशीम (वय 40) हा कट्टरवादाला खतपाणी घालत होता.

भारतानेही दिला होता इशारा
श्रीलंका, तमिळनाडू आणि केरळमधील युवकांनी या भागात इसिसची राज्य निर्माण करावे, असे आवाहन करतानाचा हशीमचा व्हिडिओ भारतीय तपास संस्थांना आढळून आला होता. तसेच श्रीलंकेतील चर्चला दहशतवादी लक्ष्य करू शकतात, असा इशाराही भारतीय गुप्तचर संस्थांनी श्रीलंकेतील समकक्ष यंत्रणांना दिला होता.

loading image