श्रीलंकेत होणार गोहत्या बंदी; पंतप्रधान राजपक्षे यांनी केली घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 9 September 2020

श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्या सरकारने गोहत्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलंबो- श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्या सरकारने गोहत्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. राजपक्षे यांनी सत्ताधारी श्रीलंका पोडूजना पेरुमना समुदयाला (SLPP) संसदेत सांगितले की, सरकार लवकरच गोहत्या बंदीचा कायदा करणार आहे. त्यांनी म्हटलं की यावर फार पूर्वीपासून विचार केला जात होता, पण कायदा करण्यात आला नाही. असे असले तरी देशात गोमांस खाण्यावर बंदी असणार नाही, आयात केलेले गोमांस खाता येणार आहे. 

खूप काळापासून याची मागणी होत होती

राजपक्षे देशाच्या बोद्ध शासन, धार्मिक आणि सांस्कृती विभागाचे मंत्री आहे. याबाबतचा प्रस्ताव केव्हा सादर केला जाईल, याबाबतची माहिती त्यांनी दिलेली नाही. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात बोद्ध धर्म मानणारे लोक आहेत. देशातील ९९ टक्के लोक मांसाहारी आहेत. मात्र, हिंदू आणि बोद्ध धर्म मानणारे लोक गोमांस खात नाहीत. रिपोर्टनुसार, बोद्ध समुदायाचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून गोहत्येवर बंदी आणण्याची मागणी करत होते. अखेर राजपक्षे सरकारने याबाबत काही ठोस निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. 

अभिमानास्पद! अभूतपुर्व योगदानाबद्दल स्पेसक्राफ्टला दिले कल्पना चावलाचे नाव

गोमांसच्या आयातीवर बंदी नाही

राजपक्षे यांनी स्पष्ट केलं आहे की, देशात जरी गोहत्या बंदी करण्यात येणार असली तरी गोमांसाच्या आयातीवर बंदी असणार नाही. याचा अर्थ गोमांस खाण्यावर बंदी असणार नाही. विशेष म्हणजे राजपक्षे यांच्या या प्रस्तावाला सत्ताधारी पक्षातील कोणत्याही सदस्याने विरोध केला नाही. पक्षानेही स्पष्ट केले आहे की, वोटबँकसाठी अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Lanka to ban cow slaughter Prime Minister Rajapaksa made the announcement