अस्थिर श्रीलंकेला ७ दिवसांत मिळणार नवे राष्ट्रपती; सभापतींची माहिती | sri lanka crisis new president within 7 days says speaker | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka

अस्थिर श्रीलंकेला ७ दिवसांत मिळणार नवे राष्ट्रपती; सभापतींची माहिती

कोलंबो : श्रीलंकेत सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, तिथल्या संसदीय सभापतींनी शुक्रवारी श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती एका आठवड्यात निवडण्यात येतील, अशी माहिती दिली. गोटाबाया राजपक्षे यांचा राष्ट्रपतीपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. मात्र राजपक्षे आधीच देश सोडून पळून गेले आहेत. (Sri Lanka News in Marathi)

हेही वाचा: कोणीही चालेल, पण PM पदासाठी ऋषींना पाठिंबा नको; माजी पंतप्रधानांचे आवाहन

सभापती महिंदा यापा अभयवर्धने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "गोटाबाया यांनी गुरुवारी कायदेशीररित्या राजीनामा दिला आहे. आपण राष्ट्रपतीपद सोडत असल्याची माहिती राजपक्षे यांनी सिंगापूरहून स्पीकरला दिली होती. गंभीर आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेत लोक मोठ्या प्रमाणावर निदर्शने करत आहेत, त्याच दरम्यान राष्ट्रपतींनी देश सोडून पळ काढला होता. तेव्हापासून आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे.

हेही वाचा: श्रीलंका : राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी आंदोलकांना आढळली दीड कोटींची रक्कम

गुरुवारी रात्री उशिरा मालदीवमधून सिंगापूरला पोहोचल्यानंतर गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा सुपूर्द केला. श्रीलंकेने 1978 मध्ये अध्यक्षीय पद्धती स्वीकारल्यानंतर राजपक्षे हे राजीनामा देणारे पहिले राष्ट्रपती आहेत.

नवीन नेत्याची निवड होईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळतील, असे सभापतींनी सांगितले. सर्व खासदारांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याची विनंती विक्रमसिंघे यांनी जनतेला केली. श्रीलंकेच्या संसदेची शनिवारी बैठक होणार आहे.

Web Title: Sri Lanka Crisis New President Within 7 Days Says Speaker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top