श्रीलंका आणखी स्फोटाने हादरली; कोलंबोजवळच झाला स्फोट

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 एप्रिल 2019

कोलंबोपासून 40 किमी अंतरावर असलेल्या पुगोडा शहरात हा स्फोट झाला असून, स्फोटात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. पुगोडातील न्यायालयाजवळील कचऱ्याच्या ढिगात हा स्फोट झाला आहे. या स्फोटाचा तपास करण्यात येत असून, शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो आठ बॉम्बस्फोटांनी हादरली असतानाच आज (गुरुवार) आणखी एक स्फोट झाल्याचे वृत्त आहे. कोलंबोजवळील पुगोडा गावात हा स्फोट झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलंबोपासून 40 किमी अंतरावर असलेल्या पुगोडा शहरात हा स्फोट झाला असून, स्फोटात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. पुगोडातील न्यायालयाजवळील कचऱ्याच्या ढिगात हा स्फोट झाला आहे. या स्फोटाचा तपास करण्यात येत असून, शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. न्यायालयाच्या मागील बाजूस हा स्फोट झाला आहे. स्फोटात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

कोलंबो शहरात ईस्टर संडेला झालेल्या आठ स्फोटांमध्ये सुमारे 359 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, 500 हून अधिक जण जखमी झाले होते. या स्फोटाची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. स्फोटानंतर श्रीलंकेत आणीबाणीही घोषित करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Lanka Minor blast in Pugoda town near Colombo no casualties