श्रीलंकेत परिस्थिती चिघळली; मंत्र्याची आत्महत्या, घरंही पेटवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sri lanka ruling party mp amarakeerthi athukorala kills protesters takes own life after being surrounded

श्रीलंकेत परिस्थिती चिघळली; मंत्र्याची आत्महत्या, घरंही पेटवली

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेतील परिस्थीती दिवसेंदिवस बिघडत जात आहे. महिंद्रा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत उसळलेल्या हिंसाचाराच्या वेळी सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने आधी निदर्शकांवर आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Sri lanka crisis)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निट्टंबुवा शहराबाहेर आंदोलकांनी खासदार अमरकिर्थी अथुकोर्ला यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमरकीर्ति अथुकोरला यांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या घटनेत दोन जणांना गोळ्या घातल्या, त्यापैकी एकाचा नंतर मृत्यू झाला. आंदोलकांवर गोळीबार केल्यानंतर खासदार अमरकीर्ति अथुकोरला यांना जमावाने घेरले होते, त्यानंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

विशेष म्हणजे, सोमवारी श्रीलंकेत पंतप्रधान राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर देशात हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. आंदोलक एकामागून एक राजकारणी आणि खासदारांची घरे जाळत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा: संजय राऊत, एकनाथ शिंदेंचे रुग्णालयातील फोटो शेअर करत भाजपचा शिवसेनेला टोला

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी कोलंबोच्या मोरातुवा भागात महापौर समन लाल फर्नांडो यांच्या घरालाही आग लावली. समनलाल फर्नांडो महिंद्रा हे राजपक्षे यांचे समर्थक मानले जातात. श्रीलंकेच्या खासदार अरुंडिका फर्नांडो यांच्या कोच्चिकडे येथील घरालाही जमावाने आग लावली. आंदोलक जमाव आता सरकारी मालमत्तेचेही नुकसान करत आहे. जमावाने हंबनटोटा येथील डीआर राजपक्षे यांचे स्मारकही उद्ध्वस्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुनेगला शहरातील महिंद्रा राजपक्षे यांचे आणखी एक विश्वासू जॉनस्टन फर्नांडो यांचे कार्यालय आणि घरही जाळण्यात आले. या जाळपोळीत डझनहून अधिक वाहनेही जाळण्यात आली आहेत.

हेही वाचा: केंद्र सरकार राजद्रोहाच्या कलमाबाबत पुनर्विचार करणार; सुप्रीम कोर्टात माहिती

श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. देशात हाहाकार माजला आहे. लोकांना दोन वेळचे अन्न देखील मिळत नाही. खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे. अर्थव्यवस्था चालवण्यासाठी पैसा नाही. सरकारच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे.

Web Title: Sri Lanka Ruling Party Mp Amarakeerthi Athukorala Kills Protesters Takes Own Life After Being Surrounded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sri Lankafood crisis
go to top