संजय राऊत, एकनाथ शिंदेंचे रुग्णालयातील फोटो शेअर करत भाजपचा शिवसेनेला टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP ram satpute criticize shivsena over eknath shinde and sanjay raut photo in hospital

संजय राऊत, एकनाथ शिंदेंचे रुग्णालयातील फोटो शेअर करत भाजपचा शिवसेनेला टोला

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यावर चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे लीलावती रुग्णालयातील एमआरआय दरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली. दरम्यान या प्रकरणात भाजपचे नेते राम सातपुते यांनी ट्विट करत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

एमआरआयमशीन केंद्रात कॅमेराला परवानगी कशी दिली? की हे निव्वळ फोटोसेशन होते? हा मोठा स्कॅन नाही स्कॅम आहे. याची चौकशी व्हायला हवी, असे शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे य़ांनी ट्विट केलं होतं. कायंदे यांना टॅग करत भाजप आमदार राम सातपुते यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांचे जूने रुग्णालयातील फोटो ट्विट केले आहेत. तसेच शिवसेनेने हॉस्पिटल मधील फोटो वर बोलण्याअगोदर हे फोटो झूम करून बघून सांगावं ते कोणत्या बगीचामध्ये काढले आहेत? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा: अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? न्यायालयाने राणांना फटकारले

दरम्यान हनुमान चालिसा प्रकरणी न्यायालयीन कोठडीतून सुटल्यावर प्रकृती खालावल्याने खासदार नवनीत राणांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राणा यांचे रुग्णालयातील अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

वैद्यकीय तपासणी सुरू असताना नवनीत राणांच्या फेसबुकवरून त्याचे लाईव्ह देखील केले जात होते. एमआरआय कक्षात धातू, चुंबक, दागिने, काचेची वस्तू बाहेर काढून ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात, तसेच प्रवेशद्वारावर नमूद केलेले असते; मात्र नवनीत राणांना हे नियम लागू होत नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात होता.

हेही वाचा: नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? माहिम दर्ग्याच्या विश्वस्ताची कसून चौकशी

Web Title: Bjp Ram Satpute Criticize Shivsena Over Eknath Shinde And Sanjay Raut Photo In Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top