
श्रीलंकन पंतप्रधानांचे देशाला उद्देशुन संबोधन म्हणाले, तुमच्या आंदोलनामुळे देश....
कोलंबो : नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार काम करत असल्याचे श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज सोमवारी (ता.११) सांगितले. आंदोलकांनी त्यांचे आंदोलन थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली. प्रत्येक सेकंदाला तुम्ही रस्त्यावर निदर्शने करता, त्यावेळी आपण डाॅलर्स गमावतोय, असे देशाला उद्देशून संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले.
श्रीलंका भीषण अशा आर्थिक संकटातून जात आहे. राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजपक्षे यांच्यावर दबाव वाढत आहे. आर्थिक संकटाला श्रीलंका तोंड देत आहे. भारनियमन, गॅस, अन्न आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची टंचाईने त्रस्त लोक रस्त्यावर आंदोलन करित आहेत. त्यांना शांत करण्यासाठी पंतप्रधान राजपक्षे यांनी देशाला उद्देशून संबोधित केले.
हेही वाचा: Sri Lanka|श्रीलंकेत नागरिक आक्रमक, सरकारविरोधात निदर्शने सुरुच
सरकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे आर्थिक संकटावर मात करण्यासाठी काम करित आहे, असे महिंदा राजपक्षे म्हणाले. नागरिकांनी आणि विरोधी पक्षांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना महिंदा राजपक्षे यांनी देशाला संबोधित केले.
Web Title: Sri Lankan Pm Said Every Second You Protest We Lose Dollars
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..