Sri Lanka Crisis: श्रीलंकन राष्ट्रपती राजपक्षेंनी आणीबाणी घेतली मागे

Sri Lanka Crisis: श्रीलंकन राष्ट्रपती राजपक्षेंनी आणीबाणी घेतली मागे

कोलंबो: श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी आपला आणीबाणीचा निर्णय काही दिवसांतच मागे घेतला आहे. श्रीलंकेतील वाढत्या महागाईमुळे निर्माण झालेल्या अराजक परिस्थितीत नागरिक रस्त्यावंर उतरले होते. प्रक्षोभक जनतेला शमवण्यासाठी म्हणून ही आणीबाणी लागू करण्यात आली होती. काल मंगळवारी रात्री उशीरा त्यांनी ही आणीबाणी रद्द केली आहे. गेल्या एक एप्रिल रोजी परिस्थितीला सावरण्यासाठी त्यांनी हा आणीबाणीचा निर्णय घेतला होता. (Sri Lankan President Gotabaya Rajapaksa)

Sri Lanka Crisis: श्रीलंकन राष्ट्रपती राजपक्षेंनी आणीबाणी घेतली मागे
देखमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज, CBI ताब्यात घेणार?

मंगळवारी रात्री जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचना क्रमांक 2274/10 मध्ये, राष्ट्रपतींनी सांगितलंय की, त्यांनी आणीबाणी नियम अध्यादेश मागे घेतला आहे. श्रीलंकेत सुरु असलेल्या आर्थिक संकटाचा निषेध व्यक्त करण्यासाठी संतापलेली जनता राष्ट्रपती आणि सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली होती. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी एक एप्रिल रोजी ही सार्वजनिक आणीबाणी लागू करण्यात आली होती. तरीही तीन एप्रिल रोजी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर आले होते. हे पाहता त्यानंतर मग सरकारने देशव्यापी कर्फ्य लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कडक कर्फ्यू आणि आणीबाणी असतानाही सरकारविरोधातील निदर्शने ही तशीच सुरु राहिलेली दिसून आली. लोक सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या घरांना घेरून आपला निषेध व्यक्त करत होते.

Sri Lanka Crisis: श्रीलंकन राष्ट्रपती राजपक्षेंनी आणीबाणी घेतली मागे
मेधा पाटकर ईडीच्या रडारवर; गैरव्यवहाराचे आरोप

यातील अनेक आंदोलनांना हिंसक वळण लागल्याने अनेक जण जखमी झालेत तर काही वाहनेही जाळण्यात आली आहेत. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळ लावलेले स्टील बॅरिकेड खाली खेचल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचाही मारा करुन गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर, अनेकांना अटक करण्यात आली आणि कोलंबो शहरातील बहुतांश भागात थोडक्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. श्रीलंकेत परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅससारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसातून 13 तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com