अमेरिकेत कर्मचाऱ्याने चोरलेले विमानच दुर्घटनाग्रस्त

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

अमेरिकेच्या सिएटलमध्ये एक चोरीची अनोखी घटना समोर आली आहे. अलास्का एअरलाइन्सच्या मेकॅनिकने शुक्रवारी रात्री सिएटल टैकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका रिक्त प्रवासी विमानाची चोरी करून ते उडविले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी लढाऊ विमानांना पाठविण्यात आले. मात्र, काही वेळातच ते विमान पुजेट साउंड नावाच्या एका छोट्या बेटावर दुर्घटनाग्रस्त झाले. 

सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेच्या सिएटलमध्ये एक चोरीची अनोखी घटना समोर आली आहे. अलास्का एअरलाइन्सच्या मेकॅनिकने शुक्रवारी रात्री सिएटल टैकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका रिक्त प्रवासी विमानाची चोरी करून ते उडविले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी लढाऊ विमानांना पाठविण्यात आले. मात्र, काही वेळातच ते विमान पुजेट साउंड नावाच्या एका छोट्या बेटावर दुर्घटनाग्रस्त झाले. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षे वयाचा मेकॅनिक हवेत विमानाच्या कसरती करत होता. त्याला विमान चालविता येत नव्हते. त्यामुळे ते दुर्घटनाग्रस्त झाले. मात्र, यामध्ये पाठलाग करणाऱ्या लढाऊ विमानांचा कोणताही सहभाग नाही. 

पीअर्स कौंटी शेरिफच्या विभागातील प्रवक्ता एड ट्रोयर यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की त्या व्यक्तीची स्वत:ला नुकसान करून घेण्याची वृत्ती होती. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे, की सायंकाळच्या सुमारास होराईजन इअर क्‍यू 400 हे विमान हवेत मोठ्या चकरा मारत आहे आणि धोकादायक कसरती करत आहे. विमानात एकही प्रवासी नव्हता. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लढाऊ विमाने पाठलाग करत असताना ते विमान वॉशिंग्टनच्या दक्षिण-पश्‍चिम भागातील केट्रोन बेटावर दुर्घटनाग्रस्त झाले. मात्र, त्याठिकाणी कोणताही मृतदेह आढळला नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. विमान पळवून नेलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, हवाई नियंत्रण कक्षाने त्याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधताना "रिक' नावाने बोलावून विमान खाली उतरविण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stolen Plane Crashes After Airline Employee Takes Off From Seattle Airport