युद्ध सराव तातडीने थांबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China-Taiwan Latest News

युद्ध सराव तातडीने थांबवा

वॉशिंग्टन - अमेरिकेतील नेत्या नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर संतप्त झालेल्या चीनने तैवानच्या जवळ सुरु केलेला युद्ध सराव तातडीने थांबवावा, असे आवाहन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांनी केले आहे. तसेच, तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये शांतता आणि स्थैर्य टिकविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही या तीन देशांनी सांगितले.

तैवानला भेट देणाऱ्या पेलोसी या गेल्या २५ वर्षांमधील अमेरिकेच्या पहिल्या वरीष्ठ पदावरील नेत्या होत्या. पेलोसी यांनी तैवानच्या अध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्याशीही चर्चा केली. त्यामुळे, तैवानला आपलाच हिस्सा मानणाऱ्या चीनने संताप व्यक्त करताना हा स्वायत्ततेवर हल्ला असल्याची टीका केली आहे. तसेच, प्रसंगी बळाचा वापर करून तैवानला चीनमध्ये विलीन करून घेऊ असा इशारा देत मोठा युद्धसराव सुरु केला आहे.

‘आसिआन’ देशांच्या परराष्ट्र मंत्री पातळीवरील बैठकीच्या निमित्ताने या तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तैवान मुद्द्यावर चर्चा केली. ‘चीनने राजनैतिक मार्गाने हा वाद मिटवावा. प्रचंड मोठा लष्करी सराव सुरु असल्याने आशियात अशांतता निर्माण झाली असून त्यांनी डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला आहे. त्यामुळे चीनने तातडीने हा युद्धसराव थांबवावा,’ असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Stop War Exercises Immediately Us And Australia Appeal To China

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ChinaUSWaraustralia