मनसेचा अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द; सांगितलं हे कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

मनसेचा अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द; सांगितलं हे कारण

मुंबई : मनसेने ऊद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरतीचं आयोजन केलं होतं. त्यासंबंधित आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर आता मनसेकडून हा महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

उद्या रमजान ईद या सणासाठी व्यत्यय येऊ नये म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मनसेचा महाआरतीचा कार्यक्रम आता होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा: 'कुणी कितीही आदळआपट केली तरी महाराष्ट्रात जातीय दंगली भडकणार नाहीत'

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भोंग्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला. जर ३ तारखेनंतर भोंगे खाली उतरवले नाही तर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवणार आहोत असा इशारा त्यांनी परत दिला आहे. तसेच उद्या इस्लाम धर्मियांचा ईदचा सण आहे. त्याच मुहूर्तावर मनसेकडून राज्यभर महाआरती करण्यात येणार होती. पण ईद उत्सवामध्ये व्यत्यय नको म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

औरंगाबाद येथील सांस्कृतीक मंडळाच्या मैदानात काल राज ठाकरे यांनी सभा घेत पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. ईदच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही भोंग्याचा आवाज ऐकणार नाहीत असा इशारा देत त्यांनी हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा सभा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेणार आहे असंही त्यांनी जाहीर सभेवेळी सांगितलं आहे.

"उद्या ईदचा सण आहे. मुस्लिम समाजाच्या या सणामध्ये कुठलाही बाधा आणायचा नाही. म्हणून अक्षय्य तृतीयेला कुणीही आरत्या करु नका. पुढे आपण काय करायचं हे मी ट्वीट करुन कळवेन." असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे

Web Title: Akshay Trutiya Mahaarti Session Cancelled By Mns Raj Thackeray Ramjan Eid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top