

Tension in the Persian Gulf
esakal
Iran Navy Warning Hormuz 2026: इराणवर अतिप्रचंड हल्ले करण्याची ट्रम्प यांची धमकी प्रत्यक्षात येण्यासाठीची वेळ नजीक येत असतानाच अमेरिका, इस्राईल आणि इराणने दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी जाहीर केली. यामुळे इराण आणि आखाती देशांवर होणारे हल्ले थांबणार असून इराणने चर्चेचीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा आपला इशारा मागे घेतला आहे. या घडामोडींमुळे जगाने सुटकेचा निःश्वास सोडला.